टाकळी ते सिपोरा बाजारसाठी मानव विकासची बस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:05+5:302021-02-23T04:47:05+5:30
भोकरदन : शालेय मुलींची गैरसोय होऊ नये, यासाठी टाकळी ते सिपोरा बाजार ही बससेवा सुरू ...

टाकळी ते सिपोरा बाजारसाठी मानव विकासची बस सुरू
भोकरदन : शालेय मुलींची गैरसोय होऊ नये, यासाठी टाकळी ते सिपोरा बाजार ही बससेवा सुरू करण्याची मागणी सरपंच मंगला बळीराम गावंडे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन जाफराबादर आगाराच्या वतीने बससेवा सुरू करण्यात आली आहे.
भोकरदन तालुक्यातील टाकळी हे गाव सिपोरा बाजारपासून पाच ते सहा किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे, दावतपूर हे गावही टाकळीला लागूनच आहे. या दोन्ही गावांची मुले शिक्षणासाठी सिपोरा बाजार येथे जातात. या दोन्ही गावांच्या मिळून तब्बल ३५ ते ४० मुली शिक्षणासाठी जातात, परंतु बस सुरू नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्याची मागणी सरपंच मंगला गावंडे यांनी १२ फेब्रुवारी रोजी जाफराबाद आगारप्रमुखांकडे करण्यात आली होती. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला होता.
या मागणीची आगारप्रमुखांनी तत्काळ दखल घेऊन मानव मिशनची बससेवा सुरू केली आहे. टाकळी येथे बस येताच, ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व चाकल, वाहकांचा सत्कार केला.