घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:27 IST2021-02-20T05:27:58+5:302021-02-20T05:27:58+5:30

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील गट क्रमांक ८१२ मधील भाऊसाहेब हरी ठाले यांच्या राहत्या घराला बुधवारी ...

The house caught fire and the household goods were burnt to ashes | घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक

घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील गट क्रमांक ८१२ मधील भाऊसाहेब हरी ठाले यांच्या राहत्या घराला बुधवारी दुपारी आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

आव्हाना येथील भाऊसाहेब ठाले हे कुटुंबासह शेतात राहतात. बुधवारी दुपारी अचानक घरामधून धुराचे लोट निघताना शेजारी असलेल्या मुलांना दिसले. मुलांनी याची माहिती भाऊसाहेब ठाले यांना दिली. परंतु, तोपर्यंत त्यांच्या घरातील कपडे, धान्य, पैसे, तीन पत्रे व शेतीचे साहित्य जळून खाक झाले होते. दुपारच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात असल्यामुळे व जनावरे चरण्यासाठी सोडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत जवळपास सरासरी एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The house caught fire and the household goods were burnt to ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.