स्त्रियांचा सन्मान करा - निशिगंधा वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:37 AM2018-10-17T00:37:56+5:302018-10-17T00:38:58+5:30

महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. मात्र अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. यामुळे यासाठी महिलांनीच लढा द्यावा लागेल. महिलांना दुय्यमस्थान देण्याची मानसिकता बदलून महिलांचा सर्वानी सन्मान केला पहिजे असे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले

Honor women - Nishigandha Wad | स्त्रियांचा सन्मान करा - निशिगंधा वाड

स्त्रियांचा सन्मान करा - निशिगंधा वाड

Next
ठळक मुद्देगुंडेवाडी येथे सॅनिटरी नॅपकीन स्वयंचलीत मशिनचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. मात्र अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. यामुळे यासाठी महिलांनीच लढा द्यावा लागेल. महिलांना दुय्यमस्थान देण्याची मानसिकता बदलून महिलांचा सर्वानी सन्मान केला पहिजे असे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.
जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंचलीत सॅनिटरी नॅपकीन मशिन बसविण्यात आले. याचा शुभारंभ मंगळवारी निशिगंधा वाड यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर होते. यावेळी सीमा खोतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, संतोष मोहिते, सरपंच पंचफुलाबाई गजर, जि.प.सदस्य बबन खरात, नाना घुगे, पं.स. सभापती पांडूरंग डोंगरे, अभिमन्यू खोतकर, पं.स.सदस्य कृष्णा खिल्लारे, सुनील कांबळे, माजी. सरपंच . सुधाकर वाडेकर, फेरोजलाला तांबोळी, सहायक गटविकास अधिकारी गुंजकर, प्रविण पवार, विस्तार अधिकारी एस.डी. चौधर, व्ही.डी. चव्हाण आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. विशेष करुन मासिकपाळीच्या बद्दल ग्रामीण भागात आजही अनेक अंधश्रध्देमुळे याचा महिलांना त्रास सहन करावा लगतो. महिलांनी कुठलाच संकोच न बाळगता आपल्या शरीर स्वास्थायाकडे लक्ष द्यावे, कारण शरीरस्वास्त्य पेंक्षा दुसरी श्रीमंती नाही. स्वच्छतेबाबत महिलांनी अग बाई अरेच्छा.. असे स्वच्छतेच्या बाबतीत करु नये वाड यांनी सांगितले. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीने आदर्श घ्या- खोतकर
जालना तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामपंचायतीने महिलां आणि किशारवयीन मुलींसाठी गावातच स्वयंचलीत सॅनिटरी नॅपकीन मशिन बसवून जिल्ह्यात चांगला आदर्श निर्माण केला आहे. यामुळे गुंडेवाडीचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रा.पं. घेण्याचे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी केले. या चांगल्या उपक्रमामुळे महिलांमध्ये एक चळवळ निर्माण होईल. तसेच यामुळे महिलामध्ये मोकळेपणा येईल असे खोतकर म्हणाले. बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. सिताबाई मोहिते आणि इतर आदर्श महिलांचे उदाहरणे देऊन महिलांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेऊन आपली प्रगती करावी असे खोतकर म्हणाले.

Web Title: Honor women - Nishigandha Wad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.