इतिहासाचे स्मरण ठेवणारेच इतिहास घडवतात - घोगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:13+5:302021-01-15T04:26:13+5:30

आष्टी : स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत शिवशाहीर ...

History is made by those who remember history - Ghogare | इतिहासाचे स्मरण ठेवणारेच इतिहास घडवतात - घोगरे

इतिहासाचे स्मरण ठेवणारेच इतिहास घडवतात - घोगरे

आष्टी : स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी व्यक्त केले.

आष्टी येथील छत्रपती शिवाजीनगर येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. सानप, सोमनाथ शेळके, डॉ. एन. के. सरकटे, जे. आर. बरसाले, प्रा. मनोजकुमार गायकवाड, श्रीकृष्ण टेकाळे, प्रल्हाद वाहुळे, दादाराव चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जो समाज इतिहासाचे स्मरण ठेवतो तोच इतिहास घडवतो, असे सांगून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे घोगरे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी रमेश शेंडगे, शिवशक्ती आढाव, अंबादास पोळ, सुनील बागल, कैलास भोसले, कृष्णा बागल, दिलीप बुजुळे, गोविंद बागल, माउली शेंडगे, नारायण सोळंके यांनी प्रयत्न केले.

Web Title: History is made by those who remember history - Ghogare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.