उच्चशिक्षितांनी राजकारणात येताना अधिकचा मेंदू काढून ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:50+5:302021-02-18T04:56:50+5:30
जालना : राजकारणात गोरा - काळा, शिक्षित - अडाणी असा भेदभाव नसतो. इंग्रजी आलीच पाहिजे असेही बंधन नाही. जनतेच्या ...

उच्चशिक्षितांनी राजकारणात येताना अधिकचा मेंदू काढून ठेवावा
जालना : राजकारणात गोरा - काळा, शिक्षित - अडाणी असा भेदभाव नसतो. इंग्रजी आलीच पाहिजे असेही बंधन नाही. जनतेच्या अडचणी माहिती असाव्या लागतात. एकदाच चौकार किंवा षट्कार मारायला जाल तर आऊट व्हाल. रोज एक रन काढा म्हणजे टिकाल. आज सर्व क्षेत्रात चांगल्या माणसांची कमतरता आहे. अशा लोकांच्या आम्ही मागं लागतो. नेत्यांचं ऐकावं लागतं. हे लक्षात ठेवून बुद्धिवंतांनी राजकारणात येताना आपला अधिकचा मेंदू काढून ठेवावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिला.
सामाजिक व कृषी अर्थ तज्ज्ञ डॉ. दिलीप अर्जुने यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल "संघर्ष दीप" या गौरव ग्रंथाचे प्रकाशन रविवारी दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. ए.एम.डी. महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम बगडिया होते, तर श्रीनिवास भक्कड, शिक्षण तज्ज्ञ डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. रामलाल अग्रवाल, आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिवाजी मदन, सुधीर पाटील, प्रदीप खेडकर, राजेश राऊत, भास्करराव दानवे, गौरव मूर्ती डॉ. दिलीप अर्जुने, मंगला अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप पुरुषोत्तम बगडिया यांनी केला. यावेळी डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. सुशील सूर्यवंशी, डॉ. संजय सांभाळकर, सुभाष अर्जुने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. दिलीप अर्जुने यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. आभार शिवाजी उगले यांनी मानले. यावेळी सिनेट सदस्य प्राध्यापक रमेश भुतेकर, डॉ. राजेश करपे, ॲड. संजय काळबांडे, डॉ. विलास खंदारे, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. नारायण बोराडे, डॉ. रवींद्र काकडे, डॉ. जवाहर काबरा, डॉ. संदीप पाटील, कपिल आकात, प्राचार्य कविता प्राशर, डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. मीना बोर्डे, डॉ. रेणुका भावसार, डॉ. संभाजी पाटील, डॉ. कार्तिक गावंडे, आदींची उपस्थिती होती.
फोटो