मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:26+5:302021-04-03T04:26:26+5:30

जालना : मध्यंतरी कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या मागील महिन्यापासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळेच एकूण कोरोना रुग्णांपैकी ११ ...

The highest number of 11,000 patients in March | मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हजार रुग्ण

मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हजार रुग्ण

जालना : मध्यंतरी कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या मागील महिन्यापासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळेच एकूण कोरोना रुग्णांपैकी ११ हजार रुग्ण एकट्या मार्च महिन्यात निघाले आहेत, तर मार्च महिन्यातच सर्वाधिक १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या कमालीची घटली होती; परंतु गेल्या महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. या विषाणूच्या हल्ल्यामुळे ज्याप्रमाणे नागरिक हवालदिल हाेत आहेत, त्याच धर्तीवर अनेकांना याची लागण झाल्यावर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मातही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराशी हिंमत ठेवून दोन हात केलेलेच बरे.

कोरोना झाल्यावर अनेकजण त्याची धास्ती घेतात. त्यामुळे बरे होण्यास उशीर लागत आहे; परंतु त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि मानसिकता भक्कम आहे, अशांना कोरोना झाल्यावर योग्य ते औषधोपचार केल्यास त्यातून निश्चितपणे बरे होता येते. हेच अनेकांनी सिद्ध केले आहे.

जालना जिल्ह्यात मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमाली घट झाली होती. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता. जिल्ह्यात दररोज ६० ते ७० रुग्ण निघायचे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नियमांचा फज्जा उडाला. अनेकजण विनामास्क रस्त्यावर फिरत होते. सोशल डिस्टन्सिंगकडे कानाडोळा केला जात होता. त्यामुळेच मध्यंतरी कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या मार्च महिन्यात हळूहळू वाढू लागली. पाहता-पाहता जिल्ह्यात दररोज २५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यातच १२ मार्चपासून दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. कोरोनाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले. दिवसाला जिल्ह्यात ५ ते ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळेच मागील वर्षभरात सर्वाधिक रुग्ण मार्च महिन्यात निघाले आहेत. एकट्या मार्च महिन्यात तब्बल ११ हजार २९० रुग्ण आढळून आले, तर सर्वाधिक १०५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.

साडेसात हजारजणांनी केली कोरोनावर मात

गेल्या महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. या विषाणूच्या हल्ल्यामुळे ज्याप्रमाणे नागरिक हवालदिल हाेत आहेत, त्याच धर्तीवर अनेकांना याची लागण झाल्यावर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मातही केली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात तब्बल ७ हजार ६६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महिने रूग्णांची संख्या

महिना रूग्णसंख्या मयत

एप्रिल ३ ०

मे १२३ १

जुन ४२८ १४

जुलै १६९४ ६६

ऑगस्ट २५७६ ६८

सप्टेंबर ३७८९ ७०

ऑक्टोंबर २२२९ ६८

नोव्हेंबर १५६३ ३१

डिसेंबर ७८१ ३३

जानेवारी ५८१ १६

फेब्रुवारी १८१७ २७

मार्च ११२९० १०५

मार्च महिन्यात निघालेली रूग्णसंख्या

०१ मार्च १२२

०२ मार्च १९२

०३ मार्च १३१

०४ मार्च २०२

०५ मार्च १९७

०६ मार्च २१९

०७ मार्च १७२

०८ मार्च १८२

०९ मार्च २११

१० मार्च २०४

११ मार्च २५३

१२ मार्च ४००

१३ मार्च ३०८

१४ मार्च ४५२

१५ मार्च ३०४

१६ मार्च ५५२

१७ मार्च ४१९

१८ मार्च ५६७

१९ मार्च ५२०

२० मार्च ५३७

२१ मार्च ५६२

२२ मार्च ५५३

२३ मार्च ४५३

२४ मार्च ४५०

२५ मार्च ४१५

२६ मार्च ४४०

२७ मार्च ४७४

२८ मार्च ३७०

२९ मार्च ४२४

३० मार्च ५३२

३१ मार्च ४७३

एकूण ११२९०

Web Title: The highest number of 11,000 patients in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.