हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:56 AM2019-08-30T00:56:37+5:302019-08-30T00:56:57+5:30

महर्षी पराशर ऋषी व हिडींबा माता यात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे.

The Hidimba Mata Yatra festival starts on Sunday | हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ

हिडींबा माता यात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : येथील महर्षी पराशर ऋषी व हिडींबा माता यात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे या देवतांवर ग्रामस्थांची आजही तेवढीच अपार श्रद्धा आहे. यामुळे सासरी गेलेल्या लेकीबाळी देखील या यात्रेसाठी माहेरी येतात. हा यात्रा उत्सव म्हणजे परिसरातील ग्रामस्थांसाठी एक पर्वनीच होय.
तीन दिवसीय चालणाऱ्या या यात्रेत बुलडाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव इ. जिल्ह्यांमधून नागरिक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त येथे दोन दिवस कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
यात्रोत्सवा दिवशी माता हिडींबा देवीची ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली जाते. बांबू, पाचट आणि वाळलेल्या गवताच्या साहाय्याने हिडिंबा मातेची १० ते १२ फूट उंचीची अक्राळविक्राळ प्रतिमा तयार करून तिला साजेशा मुखवटा बसविला जातो. यानंतर देवीला साज चढवून तिला बैलगाडीत बसविले जाते. हा मान येथील बारी समाज बांधवांकडे पूर्वीपासून आहे.

Web Title: The Hidimba Mata Yatra festival starts on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.