आधारवड कडून वृद्ध दाम्पत्याला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:51+5:302021-02-27T04:41:51+5:30
किशन मांडवगणे व गंगाबाई मांडवगणे यांना पॅरालिसिस या गंभीर आजाराने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीमुळे वैद्यकीय उपचार करता ...

आधारवड कडून वृद्ध दाम्पत्याला मदत
किशन मांडवगणे व गंगाबाई मांडवगणे यांना पॅरालिसिस या गंभीर आजाराने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीमुळे वैद्यकीय उपचार करता येत नाही. या दाम्पत्याला उपचार करता यावे, यासाठी आधारवड फाउंडेशनच्या वतीने २० हजार रूपयांची मदत करण्यात आली. आधारवडचे अध्यक्ष श्याम वाढेकर व उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी जाऊन मदतीचा धनादेश दिला.
यावेळी डॉ. डी. आर. नवल, डॉ. उणवने यांची उपस्थिती होती. डॉक्टरांनी दोन्ही रूग्णांची पूर्व तपासणी, निरीक्षण करुन पुढील उपचारासाठी नियोजन करण्याचे आश्वासन दिले. लवकरच वैद्यकीय उपचारास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. यावेळी वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यांनी आधारवड फाउंडेशनचे आभार मानले. याप्रसंगी आधारवड फाउंडेशनचे सदस्य देविदास कऱ्हाळे, बाळासाहेब धुमाळ, शब्बीर शेख, सचिन चव्हाण, सदानंद चिखले, आसाराम चिखले, आसाराम मांडवगणे आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
260221\26jan_11_26022021_15.jpg
===Caption===
डोल्हारा येथील मांडवगणे वृद्ध दाम्पत्याला धनादेश देताना उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, डॉ.डी.आर. नवल व इतर.