शहरात अवजड वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:47 AM2021-02-23T04:47:49+5:302021-02-23T04:47:49+5:30

मोबाइलधारक त्रस्त परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा ...

Heavy vehicles piled up in the city | शहरात अवजड वाहनांची वर्दळ वाढली

शहरात अवजड वाहनांची वर्दळ वाढली

Next

मोबाइलधारक त्रस्त

परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, एकमेकांशी संपर्क साधणेही मुश्कील झाले आहे. विशेष म्हणजे इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने या ग्राहकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो.

राष्ट्रीय हिंदी विद्यालयात चिंतन दिन साजरा

जालना : शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक बी. पी. बाफना, शिक्षिका ए. एम. गोहेल, व्ही. जे. भागवत, ए. के. झंझणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कृषिपंपांची वीज तोडल्याने शेतकरी हैराण

जालना : महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी जिल्ह्यातील बहुतांश भागातील कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे रबीतील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उपलब्ध पाणीही पिकाला देता येत नसल्याने हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

संत सेवालाल महाराजांना अभिवादन

अंबड : तालुक्यातील झिरपी फाटा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अशोक बर्डे, कुमार रूपवते, रमेश वराडे, शाम राठोड, रामकिसन जाधव, हरिभाऊ खवले, श्रीहरी अण्णा वराडे, मधुकर हामने, ओमकार चव्हाण, सुरेश खरात, अर्जुन जाधव, कैलास राठोड, विष्णू भवर, अनिल राठोड आदींची उपस्थिती होती.

दाभाडी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डायटच्या डॉ. सुनीता राठोड, संजय येवते, सूर्यकांत कडेलवार, प्रदीप जनबंधू, श्रीकृष्ण निहाळ, चंद्रकांत गोल्डे, तुकाराम गिरशेट्टी, केंद्रप्रमुख विकास पोथरे, संदीप ओळेकर, महेश देशमुख, मुख्याध्यापक पंढरीनाथ खरात, श्रीकृष्ण अरदवाड, मुमताज शेख सारिका जांभाईकर, किरण गिऱ्हे आदींची उपस्थिती होती.

गुंडेवाडी येथील बालसभेस प्रतिसाद

जालना : तालुक्यातील गुंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बालसभा घेण्यात आली. यावेळी पल्लवी गजर, प्रियंका गजर, गायत्री लहाने, काेमल गजर, निकिता लहाने यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र कार्लेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वर्षा थोटे, सुनील साबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बदलत्या वातावरणाचा रबी पिकांना फटका

बदनापूर : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या बदलत्या वातावरणामुळे व गारपिटीमुळे तालुक्यातील रबी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पिकांवर रोगराई पडत असून, हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यात वीज नसल्याने अडचणींत वाढ झाली आहे.

ब्रम्हपुरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छाया शेवत्रे, शशिकला कवट, रंजना शेवत्रे, सुमन शेवत्रे, सुनीता शेवत्रे, वंदना केवट, पार्वता शेवत्रे, सरस्वती बरडे, विमल माळी, पार्वती इंगोले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Heavy vehicles piled up in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.