तपोवन गोंधन शाळेत आरोग्य तपासणी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:33+5:302021-02-07T04:28:33+5:30
टेंभुर्णी - जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शुक्रवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ...

तपोवन गोंधन शाळेत आरोग्य तपासणी - A
टेंभुर्णी - जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शुक्रवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सध्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
यावेळी शाळेतील पाचवी ते आठवीच्या ५८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी डोळ्यांचे आजार असलेल्या दोन विद्यार्थ्यांना टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात संदर्भसेवेसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य तपासणी पथकामार्फत ही तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये पथकप्रमुख डॉ. अनिल चव्हाण यांच्यासह डॉ. रुपाली वानखेडे, औषध निर्माण अधिकारी अनिल अंभोरे आदींनी सेवा दिली.
फोटो
तपोवन गोंधन शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. रूपाली वानखेडे, डॉ. अनिल चव्हाण यांनी केली.