रेणुका विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:36+5:302020-12-29T04:29:36+5:30
मंठा : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत रेणुका विद्यालयात गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

रेणुका विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
मंठा : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत रेणुका विद्यालयात गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत मास्कचा वापर अनिवार्य केला असून, प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जात आहे. वर्गात बसण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनेदेखील आवश्यक काळजी घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक काही तक्रारी असतील तर त्याबाबतीत तपासणी करून आरोग्यविषयक सल्ला आणि औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद काळे, डॉ. ज्योती सरपाते, सचिन सोनुने, दीपाली ढवळी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी रेणुका विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.जी. शेळके, उपमुख्याध्यापक सचिन राठोड, पर्यवेक्षक आर.के. राठोड आदी उपस्थित होते.