१५० नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:24 IST2021-01-09T04:24:58+5:302021-01-09T04:24:58+5:30
प्रताप बनकर, संजय हेरकर यांची निवड जालना : गटविमा गृहनिर्माण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप बनकर यांची तर सचिवपदी संजय हेरकर ...

१५० नागरिकांची आरोग्य तपासणी
प्रताप बनकर, संजय हेरकर यांची निवड
जालना : गटविमा गृहनिर्माण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप बनकर यांची तर सचिवपदी संजय हेरकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष फकिरा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रवीण कामतीकर, कार्याध्यक्षपदी आसाराम हुसे, सहकार्याध्यक्षपदी सुनील माहेश्वरी, संघटकपदी शेलार, कोषाध्यक्षपदी रमेश गोल्डे, सहसचिवपदी मदन गिरी व इतरांची निवड करण्यात आली आहे.
पदभरतीबाबत ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक
जालना : शासनाकडून विविध विभागातील पदभरती घेण्यात येत आहे. मराठा आरक्षणाची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे समाजातील नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी पदभरती प्रक्रिया पुढे ढकलावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईलधारक त्रस्त
जालना : शहरासह परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना मोबाईलवरून एकमेकांना संपर्क साधताना अडचणी येत आहेत. शिवाय इंटरनेटची गतीही मंद सुरू राहत आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.