आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:53 IST2018-10-20T00:52:50+5:302018-10-20T00:53:31+5:30
अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यापासून औषधीसाठा उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत सामान्य व गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय सुरु आहे.

आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यापासून औषधीसाठा उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत सामान्य व गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय सुरु आहे.
सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखापुरी, लखमापुरी, वडीकाळ्या, ताड हदगाव,भारडी, वडी, लासुरा,झिरपी,कौडगाव, कुक्कडगाव, करंजळा,जालुरा,मठतांडा, सोनक पिंपळगाव, पांगरखेडा, रेवलगाव, इश्वरनगर,वसंतनगर,कैलासनगर,बनगाव आदी जवळपास २५ गावांचा समावेश होतो. तसेच सुखापुरी हे गाव मध्यवस्तीत वसलेले असल्याने व तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जाणे आर्थिक दुष्या परवडणारे नाही. यामुळे येथील केंद्रात रुग्णांची चांगली गर्दी असते. ताप, हिवताप, सर्दी,खोकला या सारख्या साथीच्या आजारासाठी दररोज ७० ते ७५ रुग्ण येथे दररोज येतात.मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र ते मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहे. सरकारी दवाखाना उपलब्ध असतांना देखील गरीब व सामान्य रुग्णांना पुरेशी सेवा या ठिकाणी मिळत नसल्याने नाही. आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केंद्रात येणाऱ्याची गैरसोय होत आहे. विकतचे पाणी पिण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी करुनही येथील समस्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकात संताप आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.