टेंभुर्णी पोलिसांकडून हातभट्टी दारुचा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:18+5:302021-09-06T04:34:18+5:30
सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांची धडक कारवाई : अवैध धंद्यावाल्यांना भरली धडकी टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलिसांनी केलेल्या एका ...

टेंभुर्णी पोलिसांकडून हातभट्टी दारुचा अड्डा उद्ध्वस्त
सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांची धडक कारवाई : अवैध धंद्यावाल्यांना भरली धडकी
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत परिसरातील कुंभारझरी येथे हातभट्टी दारुचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी दुपारी केली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना कुंभारझरी परिसरातील पूर्णा पात्रात हातभट्टी दारू पाडली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाकरे यांनी सापळा रचून त्या परिसरात छापा टाकला. यात एका ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणे सुरू होते. पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी हातभट्टीचा पूर्ण अड्डा जागेवरच उद्ध्वस्त केला. या कारवाईत दारू व इतर साहित्य मिळून जवळपास ८ हजार रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला. या कारवाईत एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्यासह फौजदार सतीश दिंडे, बीट जमादार पंडित गवळी, पोलीस कर्मचारी दिनकर चंदनशिवे, गजेंद्र भुतेकर यांनी केली. दरम्यान, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच रवींद्र ठाकरे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात एकामागून एक धडक कारवाया सुरू केल्याने अवैध धंद्यावाल्यांना धडकी भरली आहे.
फोटो-
कुंभारझरी परिसरात हातभट्टी दारुचा अड्डा उद्ध्वस्त करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, गजेंद्र भुतेकर, पंडित गवळी आदी.