हसनाबादच्या बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: April 27, 2015 00:57 IST2015-04-27T00:42:47+5:302015-04-27T00:57:02+5:30
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून ही गावात येणाऱ्या बसच्या फेऱ्यासर्वच आगाराने बंद केल्याने प्रवाशांची ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे

हसनाबादच्या बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांचे हाल
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून ही गावात येणाऱ्या बसच्या फेऱ्यासर्वच आगाराने बंद केल्याने प्रवाशांची ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
हसनाबाद परिसरातील ४० गावांचा रोजचा संपर्क हसनााबादशी आहे. त्यातच आता लग्नसराईचे दिवस असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असतानाही मागील चार पाच दिवसापासून सर्वच आगाराने बसच्या फेऱ्या कमी केल्या. त्यात जाफराबाद आगाराची रात्रीची मुक्कामी बस, याच आगाराची सकाळी ८ वाजता गावात येणारी बस, सिल्लोड आगाराची मुक्कामी व दुपारी येणारी बस, औरंगाबाद आगाराची मुक्कामी व दुपारी ३ वाजता येणारी बस, जालना आगाराची मुक्कामी व दुपारीची बस ह्या सर्व बसेसे बंद अचानक बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दोन दिवसात बस फेऱ्या पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच दत्तु पाटील इंगळे यांनी सर्वच आगार प्रमुखांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)