वीणाधारकांकडून हरिनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST2020-12-30T04:40:30+5:302020-12-30T04:40:30+5:30
जालना : तालुक्यातील हिवरा तपेश्वर येथील श्री क्षेत्र विठ्ठल माळावर दरवर्षी पंचवीस ते तीस गावे मिळून साजरा केला जाणारा ...

वीणाधारकांकडून हरिनामाचा गजर
जालना : तालुक्यातील हिवरा तपेश्वर येथील श्री क्षेत्र विठ्ठल माळावर दरवर्षी पंचवीस ते तीस गावे मिळून साजरा केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला जात आहे. केवळ वीणाधारक अखंड हरिनामाचा गजर करून हा सप्ताह साजरा केला जात आहे, अशी माहिती अखंड हरिनाम सप्ताह समितीचे विठ्ठल माळ
यांनी दिली. २८ डिसेंबरपासून साधेपणाने हा अखंड हरिनाम सप्ताह परंपरा कायम ठेवण्यासाठी साजरा करण्यात येत आहे. भाविक- भक्तांनी विठ्ठल माळावर गर्दी करू नये, असे आवाहनही सप्ताह समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मागील नऊ ते दहा वर्षांपासून येथे दरवर्षी सप्ताह दरम्यान महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. शिवाय अतिशय मोठा एकमेव असा हा सप्ताह तालुक्यात समजल्या जातो; परंतु यंदा कोरोनामुळे साधेपणाने हा सप्ताह साजरा केला जात आहे.