आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:25 IST2019-07-12T00:25:02+5:302019-07-12T00:25:31+5:30
शहराचे आराध्य दैवत असलेले आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त निघणार आहे.

आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराचे आराध्य दैवत असलेले आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त निघणार आहे. यानिमित्त जुना जालना भागातील वाहतुकीमध्ये अनेक बदल केले आहेत.
ही पालखी मिरवणूक सकाळी ८ वाजता मंदिरातून निघून कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, मोरंडी मोहल्ला, कसबा मार्गे रात्री उशिरा मंदिरात विसावते. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत केले जाणार आहे. या पालखीच्या दर्शनाचा शहरासह परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.