बससेवा पूर्ववत झाल्याने विद्यार्थ्यांमधून आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:29+5:302021-01-09T04:25:29+5:30
सायगाव डोंगरगाव येथे असलेल्या आदर्श विद्यालयात पंचक्रोशीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना या बससेवेचा चांगला फायदा ...

बससेवा पूर्ववत झाल्याने विद्यार्थ्यांमधून आनंद
सायगाव डोंगरगाव येथे असलेल्या आदर्श विद्यालयात पंचक्रोशीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना या बससेवेचा चांगला फायदा होईल, असे संस्थाध्यक्ष नाथा घनघाव यांनी सांगितले. कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालयांमधील नववी ते बारावीदरम्यानचे वर्ग सुरू झालेले आहेत. परंतु, मानव विकासची बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास योजनेंतर्गतची बस सुरू करण्याची मागणी होत होती. आता ही बससेवा सुरू केली आहे. बस सुरू केल्याबद्दल एस. टी. महामंडळाचे प्रातिनिधिक स्वरूपात चालक- वाहकांचे संस्था सदस्य ज्ञानदेव घनघाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत पासेसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे, विभाग प्रमुख बाबासाहेब पाझडे, आसाराम कैलकर आदींची उपस्थिती होती.