लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे महिलांनी सोमवारी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून ग्रापंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.जामखेड येथील धनगरगल्लतील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढल्याने मोठी खळबळ उडाली. गेल्या आठवडाभरापासून धनगरगल्लीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिला संतप्त झाल्या होत्या. शेवटी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महिलांनी एकत्रित येत सोमवारी हंडा मोर्चा काढून त्यांचा रोष व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच तसेच ग्रामसेवक हजर नव्हते. शेवटी महिलांनी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून कार्यालयास कुलूप लावले. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही हे कुलूप उघडणार नाही अशी भूमिका घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता.एकूणच ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आता टँकर तसेच पाणीपुरवठा करणाºया वहिरीत उभे- आडवे बोअर घेणे हा उपाय शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याकडे आता सरपंचांनीच लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे.
महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा; ग्रा.पं. कार्यालयाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:40 IST