ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:14+5:302021-01-01T04:21:14+5:30
जालना : तालुक्यात होत असलेल्या ८५ ग्रामपंचायतीसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर ...

ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर मार्गदर्शन
जालना : तालुक्यात होत असलेल्या ८५ ग्रामपंचायतीसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर गुरूवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.
तहसीलदार श्रीकांत भुजबळ, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहारातील सेंट मेरी हायस्कूल येथे गुरूवारी परिविक्षाधीन तहसीलदार शितल बंडगर यांनी उपस्थित कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले. यावेळी ईव्हीएम मशीन बद्दलची सर्व काही माहिती देऊन मॉकपोल कसा घ्यायचा, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. ऑडिओ, व्हिडिओचा वापर करून सर्व मतदान प्रक्रिया त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितली. विशेष म्हणजे ईव्हीएम सील करणे, मॉकपोल दाखवणे, यासाठी कशी काळजी घ्यावी, मतदारांची ओळख, याबद्दल माहिती दिली. शिवाय आपल्या कर्तव्याचे पालन करून वेळेचे पालन करावे, निवडणुकीच्या कामांमध्ये अजिबात टाळाटाळ करू नये, काही अडचणी आल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पहिल्या प्रशिक्षणामध्ये नाम मात्र कर्मचारी गैरहजर होते. जवळपास १ हजार ६५५ कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षण मार्गदर्शक परिविक्षाधीन तहसीलदार शितल बंडगर, तहसीलदार तुषार निकम, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे जी. एल. सर्वे, अनिल पाटील, संदीप गाढवे, विश्वास भोरे, संदीप डोंगरे, पी. एस. रायमल, कल्याण गव्हाणे, के. के. कुलकर्णी, एस. एल. चौधरी, वाय. आर. कुलकर्णी, के. आर. डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा अनुभव कर्मचाºयांना असल्याने निश्चितच ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार पडतील, असा आत्मविश्वास प्रशिक्षणार्थिंनी व्यक्त केला.
चौकट
जालना तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षणाला दांडी मारणा-या गैरहजर कर्मचा-यांना तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या सूचनेनुसार नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अशी माहिती मनुष्यबळ व्यवस्थापनाकडून देण्यात आली. कर्तव्यात कसूर करणा-यांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
फोटो ओळ : जालना तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी सेंट मेरी हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना परिविक्षाधीन तहसीलदार शितल बंडगर. दुस-या छायाचित्रात प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचा-यांना येणा-या अडचणी दूर करताना मनुष्यबळ व्यवस्थापनाचे गणेश सर्वे व कर्मचारी.