मासिक चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:57+5:302021-01-08T05:39:57+5:30
राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्याची मागणी जालना : नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या ...

मासिक चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्याची मागणी
जालना : नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, अजित कोठारी, फिरोज बागवान, संजय कुलथे, जावेद बागवान, रफिक बागवान, शाकेर बागवान आदींची स्वाक्षरी आहे.
कृष्णा वाघ यांचा पुरस्काराने गौरव
भोकरदन : तालुक्यातील पळसखेडा मुर्तड येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक कृष्णा वाघ यांना औरंगाबादेतील सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेेवाभावी संस्थेच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे डॉ. सागर गरूड, पोनि. संतोष खेतमाळीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या पुरस्काराबद्दल वाघ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
भोकरदन : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास दांडी मारणाऱ्या ३७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमात तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार धर्माधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.