सेलगाव येथील बँक ग्राहकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:08+5:302021-02-13T04:29:08+5:30
(ता. बदनापूर) येथील नागरिकांना ऋण समाधान योजनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच आर्थिक व्यवहार दक्षतापूर्वक कसे करावेत, याची माहिती देण्यात ...

सेलगाव येथील बँक ग्राहकांना मार्गदर्शन
(ता. बदनापूर) येथील नागरिकांना ऋण समाधान योजनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच आर्थिक व्यवहार दक्षतापूर्वक कसे करावेत, याची माहिती देण्यात आली. बँकेच्या वतीने खादगाव, नागेवाडी, जवसगाव, दरेगाव आदी गावात हे अभियान राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक संतोष अय्यर, क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर
शहागड : अंबड तालुक्यातील गाेंदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत टाका येथील महिलांसाठी डॉ. महादेव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११ महिला व एका पुरुषाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डॉ. बिराजदार यांनी या शस्त्रक्रिया केल्या. यावेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
दाभाडी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण
दाभाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. शिवाजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमास डॉ. विकास गटकळ यांच्यासह पी. एम. पिसे, एन. एस. साटोटे, आर. एन. भालेराव, बी. एम. कोलते, एम. आर. खेडकर, एस. एस. दसरे, अभिजित अंभोरे, आशा रगडे, निर्मला बावस्कर, पुष्पा गिरी, सुमन अंबेकर आदींची उपस्थिती होती.