तुरीला सहा हजार रूपये हमीभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:33+5:302021-02-05T08:05:33+5:30
जालना : नाफेडच्या वतीने तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रूपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकºयांची होणारी ...

तुरीला सहा हजार रूपये हमीभाव
जालना : नाफेडच्या वतीने तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रूपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकºयांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तूर उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रास बुधवारी सभापती खोतकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तालुका निबंधक परमेश्वर वरखडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, संचालक अनिल सोनी, रमेश तोतला, गोपाल काबलिये, सचिव रजनीकांत इंगळे, अनिल खंडाळे, मोहन राठोड, नाफेडचे अंकुश परकाळ, सूर्यकांत कदम, प्रल्हाद जाधव, सचिन गोल्डे, शेतकरी शिवाजी मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील पहिले केंद्र
हमीभाव मिळाला तर शेतकºयांच्या पदरात पैसे पडतील ही दूरदृष्टी ठेवून सभापती अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात प्रथम जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू झाले आहे. काडी, कचरा विरहित तूर, खरेदीसाठी माफक दरात क्लिनिंग व ग्रिडींगची सोय बाजार समितीने उपलब्ध करून दिली आहे. शेतकºयांनी तरू विक्रीसाठी आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी केले आहे.
(फोटो)