गुरू गणेश दृष्टिहीन विद्यालयात अभिवादन
जालना : शहरातील श्री गुरू गणेश दृष्टिहीन विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक रमेश नाहार, राजू खांदवे, भागवत शिंदे, पृथ्वीराज पाजगे, मोहन साबळे, ऋषीकेश सोळुंके, विकास खरात, प्रीतम देसरडा, निकेश मदारे, सुरेश ढगे, महादू घोंगे, सुदेश सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, कचरूलाल कुंकुलोळ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
माहोरा गावामध्ये कोरोनाबाबत जनजागृती
माहोरा : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी कला पथकामार्फत कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. शाहीर नानाभाऊ परिहार, संच कोनडकर यांनी कोरोनाचा धोका, दक्षता आणि लसीकरणासह इतर बाबींवर मार्गदर्शन केले. यावेळी सुरेखा पगारे, आबा लाखे, जनार्दन पैठणे, शिवाजी वायाळ, भगवान ढवळे, डॉ. रवींद्र कासोद, उपसरपंच गजानन सोळक, नवलसिंग राजपूत, बाळासाहेब गव्हाले, शंकर गाडुळे, रामू शेळके, एकनाथ चिंचोले आदींची उपस्थिती होती.