गुंडेवाडी शाळेमध्ये अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:12+5:302021-02-22T04:20:12+5:30
महामार्गावरील फलक बसविण्याची मागणी जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय ...

गुंडेवाडी शाळेमध्ये अभिवादन कार्यक्रम
महामार्गावरील फलक बसविण्याची मागणी
जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय अपघातप्रणव क्षेत्रात अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गरजेनुसार दिशादर्शक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.
शिवजन्मोत्सवानिमित्त गुंज येथे मिरवणूक
घनसावंगी : तालुक्यातील गुंज येथे शिवजयंतीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी सरपंच उमेश काजळे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवराज जाधव, बद्री जाधव, सोपान जाधव, सोमनाथ जाधव, अशोक जाधव, गौरव जाधव, अभिषेक दुकानदार, अभिमन्यू जाधव, योगेश चव्हाण, कृष्णा रोमन आदींची उपस्थिती होती.
सेलगाव ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी
सेलगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच सहदेव अंभोरे, उपसरपंच मनोज अंभोरे, परमेश्वर अंभोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.