दोदडगाव येथील ओबीसी मंडल स्तंभाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:42+5:302021-02-06T04:56:42+5:30
वडीगोद्री : गेवराईचे माजी आमदार तथा मंडल स्तंभाचे निर्माते डॉ. नारायण मुंढे यांनी सन २००४ मध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ...

दोदडगाव येथील ओबीसी मंडल स्तंभाला अभिवादन
वडीगोद्री : गेवराईचे माजी आमदार तथा मंडल स्तंभाचे निर्माते डॉ. नारायण मुंढे यांनी सन २००४ मध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव (ता.अंबड) येथे उभारण्यात आलेल्या ओबीसी मंडल स्तंभाला गुरुवारी भेट देऊन अभिवादन केले.
दोदडगाव येथील माजी आमदार डॉ. नारायण मुंढे यांनी सन २००४ मध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे जमीन घेऊन भारतातील पहिला मंडल स्तंभ उभारला. या ओबीसी मंडल स्तंभाला भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे, मंत्री छगन भुजबळ, रणजित देशमुख, शिवाजी मोघे, महादेव जाणकर यांच्यासह आदींनी भेटी दिल्या. गुरुवारी मंडल स्तंभाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी अभिवादन केले. पुढे बोलताना मुंढे म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात असून, आमचा कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही. भारतातील ५२ टक्के ओबीसी समाजासाठी आपण नेहमीच लढा देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, मनसेचे जालना जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, सामाजिक कार्यकर्ते विजय खटके, बाबासाहेब बोंबले, भाऊसाहेब हंगारगे, माजी सरपंच अरुण घुगे, ज्येष्ठ नेते इंदराव मुंढे, प्राचार्य डी.आर. मुढे, साहित्यिक किशोर खेडकर, अरविंद मुंढे, सुघोष मुंढे, अनिकेत मुंढे, प्रा. सुनील मुढे, वामन गिते, सुदर्शन गावडे, कृष्णा खाडे, भागवत तारख, रहिम शेख, संतोष बिबे आदींची उपस्थिती होती.