महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:24+5:302021-02-05T08:00:24+5:30
फोटो जि. प. शाळा, वरखेडा सिंदखेड जालना : जालना तालुक्यातील वरखेडा सिंदखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी ...

महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
फोटो
जि. प. शाळा, वरखेडा सिंदखेड
जालना : जालना तालुक्यातील वरखेडा सिंदखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्यामकुमार खांडेभराड, बबन जाधव, विष्णू मुंढे, अर्जुन डोईफोडे, रामेश्वर घनघाव, स्नेहलता निर्मळ आदींची उपस्थिती होती.
फोटो
राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध
पारध : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य राजाराम डोईफोडे, मुख्याध्यापक विलास लोखंडे, इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुधाकर शिरसाठ, अधीक्षक किशोर वाघ, अनिल लक्कस, प्रा. राजू शिंदे, राजेंद्र जाधव, संजय तबडे, विश्वास लोखंडे, दिनेश कापरे, विवेक पराड, भागवत पानपाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते.
फोटो ओळी
पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.
कै. संतुकराव खोमणे महाविद्यालय, नाव्हा
जालना : नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात भगवान भुतेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भुतेकर यांनी महात्मा गांधींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास अध्यक्ष भगवान भुतेकर, प्रा. अश्विनी क्षिरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी, प्रा. स्वाती पुराणिक, प्रा. मेघना पत्की, सिध्दार्थ पारचा आदींची उपस्थिती होती.
राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल, जालना
जालना : येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रो. सुखदेव मांटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा रेवती मांटे, प्राचार्या लतिका मनोज, शिक्षिका फरहा शेख, एलीया गायकवाड, अमोल आधुडे, वरूण आंबेकर, अन्सार सोलंकी, अपर्णा भंडारे, माधुरी तळेकर, गुंफा निकम, लक्ष्मी ठोकर, नारायण मोरे, अशोक जाधव आदींची उपस्थिती होती.
फोटो
जि. प. हायस्कूल, माहोरा
माहोरा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. यू. डोंगरदिवे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक कृष्णा चेके, रामेश्वर खलसे, जी. एच. पवार, जे. एम. सोनवणे, रमेश भालेकर आदींची उपस्थिती होती.