गांधीजींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:32+5:302021-02-05T08:03:32+5:30

जालना : भारताचा लोकहितवादी युवा संघाच्या वतीने महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल गायकवाड, गौरव चव्हाण आदींची ...

Greetings to Gandhiji | गांधीजींना अभिवादन

गांधीजींना अभिवादन

जालना : भारताचा लोकहितवादी युवा संघाच्या वतीने महात्मा गांधीजी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल गायकवाड, गौरव चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बांधकाम साहित्य रस्त्यावर

जालना : शहरांतर्गत भागात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे.

सूचनांचे उल्लंघन

जालना : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे, परंतु शहरातील बाजारपेठेत येणारे बहुतांश नागरिक मास्क वापरत नाहीत, शिवाय सुरक्षित अंतराच्या सूचनेलाही तिलांजली दिली जात आहे.

अपघाताचा धोका

भोकरदन : शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच अनेक वाहन चालक वाहने लावत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

लोंढे यांचा सत्कार

राणीउंचेगाव : घनसावंगी विभागातील कृषी सहायक संजय लोंढे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Greetings to Gandhiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.