Grampanchayat Voting : जालना जिल्ह्यात चार तासात २८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 14:22 IST2021-01-15T14:16:30+5:302021-01-15T14:22:34+5:30
Grampanchayat Voting: मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे ईव्हीएम मशीनला शाई लागल्याने उमेदवारांनी आक्षेप घेतला.

Grampanchayat Voting : जालना जिल्ह्यात चार तासात २८ टक्के मतदान
जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार तासांमध्ये २८.१२ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ७.३० ते ११.३० पर्यंत २८. १२ टक्के मतदान झाले. २ लाख २ हजार ४७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख १३ हजार ११३ पुरूष तर ८९ हजार ३५७ महिलांचा समावेश आहे.
मंठा तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे ईव्हीएम मशीनला शाई लागल्याने उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अडीच ते तीन तास मतदान बंद राहिले होते. तहसीलदार सूमन मोरे व पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी मतदान केंद्रावर जाऊन पंचनामा करून मशीन सील केले. त्यानंतर दुसरी ईव्हीएम मशीन बसवून मतदानाला सुरूवात झाली.