शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 11:36 IST

मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा मनोज जरांगे यांचा आजचा तिसरा दिवस

- पवन पवारवडीगोद्री ( जालना): सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती त्यांना फक्त मराठा मतदान हवं आहे ते आता कशाला संपर्क करतील, ते फक्त भुजबळांशी संपर्क करतील. भुजबळ मराठ्यांच्या गावात रॅली काढतील. काय माहिती आरक्षणावर चर्चा करतात की दंगली लावतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली.

बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला. यादरम्यान तब्बेत बरी आहे, शरीर बर आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तेच पाढे गिनू नका एकदा दिलं तुम्ही तेही घातलं देतो देतो घेतो घेतो असंच तुमचं सरकार आहे. मोदी शिर्डीत आले होते, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा होती. शहा यांना चेहराच फक्त माणसाचा आहे गरिबांचे मुडदे पाडणारे लोक आहेत. मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल हे त्यांना कळेल, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी अमित शहा यांच्यावर केली. फडणवीस यांच नाही म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. आरक्षण ओबीसी कोट्यातून द्यायचं की नाही, तुम्ही हो म्हणून सांगा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, दोघांपैकी एक हो म्हणा आम्ही यावेळी बरोबर करू, असे फडणवीस यांना उद्देशून जरांगे यांनी टोला लगावला.

गोड बोलून काटा काढू नका जरांगेचा प्रसाद लाड यांना इशाराराजकारण्यांच्या आरोपावर मी काही काय बोलू? १० महिन्यापासून आम्ही आमचं आरक्षण मागतोय. आम्ही सारख हेच म्हणत आहे. आरक्षण द्या आम्ही राजकारण करणार नाही पण तुम्ही देत नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला पाडून तिथे बसावं लागेल. तुमची राजकारणाची जात. गचाळ लोक आहात तुम्ही, सरकारला सांगा ना जीआर काढा. भाऊ म्हणून काड्या करू नका, आतून ट्रॅप रचू नका, आमच्या विरोधात एकेक उतरू नका, गोड बोलून काटा काढू नका, असा इशारा जरांगे यांनी आमदार प्रसाद लाड यांना दिला.

ओबीसी यात्रेवरुन भुजबळांवर सुनावलेचांगलं आहे भुजबळांना तेवढंच एक काम आहे. भुजबळ शिवाय यांचं पान देखील हालत नाही. ओबीसी आरक्षणाला कोणता धक्का लागतो? धनगर, वंजारी यांच्या आरक्षणाला कोणता धक्का लागतो? आम्ही आरक्षणात गुंतलेलो आहे एक दिवस मोकळे होऊच आम्ही. तुम्ही विनाकारण आमच्याशी भांडण विकत घेऊ नका. तुम्ही विनाकारण कोणताही अर्थ काढू नका. आम्ही तुमच्या समाजाचा आदर करतो आणि ते म्हणतात आम्हाला घाबरता तुम्ही. आमच्याकडे रॅली काढून छगन भुजबळ हे शंभर टक्के दंगली घडवून आणणार. जर मी नाशिकला येवल्यात उपोषण सुरू केल्यावर, तुम्हाला किती वाईट वाटेल. माझ्या आता हे डोक्यातच आहे, असेही जरांगे भुजबळ यांना उद्देशून म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळ