शासनाने ओबीसींचा अंत पाहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:55+5:302021-08-23T04:31:55+5:30
गोर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले साखळी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्य ...

शासनाने ओबीसींचा अंत पाहू नये
गोर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी करण्यात आलेले साखळी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने तीन महिन्यांत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ते सर्वोच्च न्यायालयात सादर करावेत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे, केंद्र शासन करत नसेल तर राज्याने ओबीसींची जातनिहाय स्वतंत्र जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळास स्व. वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे यांसह इतर मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात. मागण्या मंजूर न झाल्यास गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राठोड यांनी दिला. यावेळी जिल्हा संघटक सुधाकर जाधव, जिल्हा सचिव रवींद्र राठोड, मुरलीधर आढे, अर्जुन चव्हाण, पंकज राठोड, संदीप जाधव, रितेश पवार, अनिल पवार, बाळू राठोड, श्याम आढे, मच्छींद्र पवार, गणेश राठोड, अमोल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.