शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:18 IST

सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला.

ठळक मुद्दे जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुका गारपीटीमुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. या तालुक्याचा आज धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधुन जाणुन घेतली.

जालना : शहराहसह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपीटीमुळे नुकसानीचे ४८ तासात पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटुनही पंचनाम्यास अद्याप सुरूवातही नाही. सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला.

रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वार्‍याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुका गारपीटीमुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. या तालुक्याचा आज धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधुन जाणुन घेतली. सरकारने ४८ तासात पंचनामे करण्याचे जाहिर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतकर्‍यांनी यावेळी मुंडेंशी बोलतांना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनीटांचा धावता दौरा करतांना आमच्या शेतांची साधी पाहणी ही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सरसकट मदत करावी यावेळी मुंडे म्हणाले की, आपण शेतकर्‍यांच्या पाठिशी असुन, शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतकर्‍यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतकर्‍यांचा अंत पाहु नका आज पिके उद्धवस्त  झाले आहेत. शेतकर्‍यांना आधार न दिल्यास शेतकरी ही उदध्वस्त होईल, अशी भिती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या समवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलु चौधरी, बळीराम कडपे, अ‍ॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीHailstormगारपीटJalanaजालना