झोपडपट्टी भागाचा विकास करून चेहरामोहरा बदलणार- गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:24+5:302021-02-24T04:32:24+5:30
जुना जालना भागातील शास्री मोहल्ला परिसरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाबूराव पवार, वाजेद ...

झोपडपट्टी भागाचा विकास करून चेहरामोहरा बदलणार- गोरंट्याल
जुना जालना भागातील शास्री मोहल्ला परिसरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक बाबूराव पवार, वाजेद खान, अमजेद खान, सय्यद रहिम, अभियंता सय्यद सऊद, एम.पी. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. गोरंट्याल म्हणाले की, गेल्या चार वर्षांत जालना नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात विकासाची कामे करण्यात आली आहेत. त्या प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार अंतर्गत जलवाहिनी या कामांसह स्वच्छता, वीज आदी कामे करून जालनेकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. शास्री मोहल्ला भागातील मातंग समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत आणि समाजमंदिर या दोन कामाबद्दल आपण आश्वासन दिले होते. त्यापैकी संरक्षक भिंतीचे काम या पूर्वीच पूर्ण झाले आहे. शहरातील सर्वंच झोपडपट्टी भागात येणार्या कालावधीत विविध योजनांच्या माध्यमातून विकासांची भरीव कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास परीसरातील नागरिक, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.