शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

गणरायाला उत्साहात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:01 IST

जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. डीजे बंदीमुळे यावेळी हा गणेश उत्सव संस्मरणीय ठरला. पारंपरिक ढोल मंडळ तसेच वाजंत्री आणि बँड पथकाला मोठी मागणी दिसून आली. अनेक मंडळांच्या लेझीम पथकाने लयबध्द सादरीकरण करून जालनेकरांची मने जिंकली. यावेळी काही ठिकाणी बंदी असलेले गाणे वाजविल्यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बराच वाद झाला.मानाच्या गणपतीची पूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,यांच्यासह गणेश महासंघाचे अध्यक्ष अग्रवाल, विनित साहनी, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, महावीर ढक्का, मेघराज चौधरी, पारस नंद, नागेश बेनिवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती चालले गावाला...चैन..पडेना भक्तांना अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुख्य मिरवणुकीत जवळपास ६२ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रात्री आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सकाळी पाच वाजेपर्यंत चालली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुलालांची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. या ढोल पथकात महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग दिसून आला.नवीन जालना भागाप्रमाणेच जुन्या जालन्यातही अनेक लहानमोठ्या गणेश मंडळांनी सकाळपासूनच वाजतगाजत मिरवणूक काढली होती. मोती तलावा जवळ एन.के. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक गणेश मंडळांना तसेच घरगुती गणेश भक्तांकडून गणपती दत्तक घेतले. तसेच कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्याची विनंती केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष खरात यांनी दिली.कादराबादेत किरकोळ कारणातून वाद...कादराबाद परिसरात मुख्य मिरवणूक रात्री १ वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी दहीहंडी फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. नंतर दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.जुन्या जालन्यातून मोती तलावात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. या मार्गावरून भविष्यात केवळ एकेरी वाहतूक करणे गरजेचेचे झाले आहे. मोती तलावात विसर्जनाच्यावेळी झालेल्या दुर्घटने नंतर रूग्णवाहिकांना जाण्यासही अडचण आली होती. परंतु गणेश भक्तांनी समयसूचकता दाखवत रूग्णवाहिका जात असताना ढोलताशा बंद ठेवून तातडीने बाजूला होत, मार्ग रिकामा केला होता. परंतु पुढच्या वर्षी या मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८