शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

खुशखबर ! कोरोना लसीचे १४ हजार २२० डोस जिल्ह्यास प्राप्त; सहा केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:42 PM

corona vaccine मकरसंक्रांतीनंतर १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १२ हजार ५०० जणांना लसीकरणरूपी ‘वाण’ देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

ठळक मुद्दे कोविशिल्ड लस बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा लस भांडारमध्ये दाखल झाली. विशेष लसीकरण वाहनातून कोविशिल्डच्या १४२२ वाईल आणण्यात आल्या आहेत. याद्वारे १४ हजार २२० जणांना डोस देता येणार आहे.

जालना : कोरोना संक्रमण रोखण्यास महत्त्वाची ठरणारी ‘वाईल’ लस बुधवारी जालना येथील जिल्हा लस भांडारमध्ये दाखल झाली आहे. १४ हजार २२० डोस क्षमता असलेले १४२२ ‘वाईल’ लसीकरण वाहनातून आणण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मकरसंक्रांतीनंतर १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १२ हजार ५०० जणांना लसीकरणरूपी ‘वाण’ देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. विशेषत: हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची मोठी उपासमार झाली. कोरोनाने आजवर जिल्ह्यात ३५५ जणांचा बळीही घेतला आहे. रूग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा संसर्ग सुरूच होता. त्यामुळे कोरोनाची लस वेळेत यावी, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले होते. कोरोना लसीकरणाबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. दोन वेळेस लसीकरणाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. लसीकरणासाठी केलेली तयारी आणि नियुक्त केलेल्या आठ केंद्रांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली होती. शासनस्तरावरून जिल्ह्यातील सहा लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हावासियांना प्रतीक्षा लागलेली कोविशिल्ड लस बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा लस भांडारमध्ये दाखल झाली. विशेष लसीकरण वाहनातून कोविशिल्डच्या १४२२ वाईल आणण्यात आल्या आहेत. याद्वारे १४ हजार २२० जणांना डोस देता येणार आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संतोष कडले, मुख्य औषध निर्माण अधिकारी आर. एस. कड, डॉ. नागदरवाड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत सोनखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप घुगे, चालक सिध्दीविनायक मापारी, रमेश राऊत, बाबासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.

या सहा केंद्रांची निवडजिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी प्रारंभी आठ केंद्रे नियुक्त केली होती. मात्र, शासनस्तरावरून सहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. यात जिल्हा रूग्णालय, अंबड उपजिल्हा रूग्णालय, भोकरदन, परतूर ग्रामीण रूग्णालयासह सेलगाव व खासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जाणार आहे.

एका वाईलमध्ये दहा जणांना डोसकोरोना लसीची एक वाईल ५ एमएलची असून, एका व्यक्तीला ०.५ एमएलचा डोस दिला जाणार आहे. एका वाईलमध्ये दहा जणांना डोस देता येणार आहे. जिल्हा लस भांडारमध्ये आलेल्या १४२२ वाईलमधून १४ हजार २२० डोस होणार आहेत.

सुरक्षेसाठी पोलिसांना पत्रजिल्हा रूग्णालय परिसरातील जिल्हा लस भांडारमध्ये कोविशिल्ड लस दाखल झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, यासाठी पोलीस दलाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीसीटीव्हीची नजर असलेल्या या जिल्हा लस भांडारमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारीही येथे २४ तास तैनात करण्यात आले आहेत.

एका महिन्याच्या अंतराने दुसरी लसएखादा व्यक्ती उजव्या हाताने काम करीत असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर लस दिली जाणार आहे. जर एखादा व्यक्ती डाव्या हाताने काम करीत असेल तर त्याच्या उजव्या हातावर लस दिली जाणार आहे. विशेषत: लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या अंतराने संबंधिताला दुसरी लस दिली जाणार आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षकोरोना लसीकरणासाठी एईएफआय समिती गठीत करण्यासह एक जिल्हा नियंत्रण कक्षही नियुक्त केले जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना, अधिकारी, कर्मचा-यांना येणाऱ्या अडीअडचणी या कक्षातून सोडविल्या जाणार आहेत.

शासकीय सूचनेनुसार प्रक्रियाकोरोनाची लस जिल्ह्यात दाखल झाली आहे. शासनाने १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाबाबत शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसारच पुढील सर्व प्रक्रिया राबविली जाईल.- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्या