शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:36 IST

तीन तासांत पाच गावांतील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथक परतले

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यात खरीप हंगामात पडलेल्या दुष्काळी परिस्थिती आढावा व पिकांची पाहणी आज दुपारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दोन सदस्यीय पथकाने केली. केवळ तीन तासात पाच गावातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची पाहणीचा पंचनामा करून पथक परतले. येणाऱ्या खरीप हंगापूर्वी मदत द्यावी अशी मागणी यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पथकाकडे केली.

कृषी मंत्रालयातील ए. एल. वाघमारे आणि हरीश उंबरजे यांच्या पथकाने सुरवातीला दानापूर येथील कोरड्या पडलेल्या जुई मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पंढरपूरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब वाघ यांच्या शेतावर जाऊन पथकाने कापूस लागवड , त्यासाठी आलेला खर्च आणि उत्पादन याची माहिती घेतली. दिड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या क्षेत्रातून केवळ एक क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले, अशी माहिती शेतकरी वाघ यांनी दिली. त्यानंतर  हसनाबाद, फुलेंनगर, येथील कापूस पिकाची तर पिप्री येथे मका व सोयाबीन पिकाची पाहणी पथकाने केली. सर्व ठिकाणी पंचनामे करून हे पथक सायंकाळी साडेपाच वाजता परतले. 

पथकसोबत सोबत अप्पर जिल्हाधिकारी रिना मैत्रावार, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार संतोष बनकर, व्ही डी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर,शेतकरी केशव जंजाळ, दत्ता पवार, रामराव दळवी, भाऊसाहेब वाघ, अनिल शिंदे, संजय पांडे, लखन पवार आदींची उपस्थिती होती. 

गाळ काढण्यास मदत करावी केशव जंजाळ या शेतकऱ्याने पथकाला दानापूर येथील जुई धरणातील गाळ काढणे व तो शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाने मदत करावी. तसेच सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईसाठी तात्काळ टॅंकर मंजूर करावे, जनावरांच्या पाण्याचा सुद्धा विचार करावा, दुष्काळी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीJalanaजालना