मुलींनी स्वत:च्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:58+5:302021-02-05T08:02:58+5:30

जालना : मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. मुलींमध्ये ...

Girls should not get married without standing on their own two feet | मुलींनी स्वत:च्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नये

मुलींनी स्वत:च्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नये

जालना : मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. मुलींमध्ये यशस्वी होण्याची क्षमता अधिक असून, त्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन इनरव्हिल क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शहरातील लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने आयोजित बाल कला महोत्सवात त्या बोलत होत्या. प्रकल्प अधिकारी जोमा मस्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हिल क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया, रश्मी गिनदोडींया, वैशाली मत्सावार संस्थेचे सुभाष क्षीरसागर, गोविंद खुळखुळे, कृष्णा वराडे, कौशल्या खरात, कैलास कोल्हे, दीपक काळदाते, समर्थ डोंगरे, सचिन सपकाळ, असेफ कुरेशी, शिवाजी काजळकर, जितेंद्र खिल्लारे, राहुल सोनवणे, संध्या बोरूडे यांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Girls should not get married without standing on their own two feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.