मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये- सोनाली जेथलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:11+5:302021-02-05T08:02:11+5:30
लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्यावतीने रविवारी बालकला महोत्सव घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लाइट ऑफ लाइफ ...

मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये- सोनाली जेथलिया
लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्यावतीने रविवारी बालकला महोत्सव घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लाइट ऑफ लाइफ ट्रस्टचा यंदाचा बालकला महोत्सव ऑनलाइन पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी जोमा मस्ती, प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया, रश्मी गिनदोंडिया, सुभाष क्षीरसागर, गोविंद खुळखुळे, कृष्णा वराडे, कौशल्या खरात, कैलास कोल्हे, दीपक काळदाते, समर्थ डोंगरे, सचिन सपकाळ, असेफ कुरैशी, शिवाजी काजळकर, जितेंद्र खिल्लारे, राहुल सोनावने, संध्या बोरुडे यांची उपस्थिती होती.
जग कोरोनासारख्या महामारीशी सामना करत असतानादेखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रांमधून विद्यार्थी व पालक गुगल मिटद्वारे ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य या स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.