मुलींनी निर्भय होऊन जगावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:22+5:302021-02-05T08:06:22+5:30
जालना : आत्म-जीवन, संवाद आणि नातेसंबंध, आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण हे महत्त्वाचे आहे. २१व्या शतकात वावरताना मुलींनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ...

मुलींनी निर्भय होऊन जगावे
जालना : आत्म-जीवन, संवाद आणि नातेसंबंध, आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण हे महत्त्वाचे आहे. २१व्या शतकात वावरताना मुलींनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात उन्नती करून निर्भयपणे जगावे. शिक्षणाने सक्षम होत असताना सामाजिक भान असणेही गरजेचे असते, असे प्रतिपादन संजय आंचलिया यांनी केले.
भारतीय जैन संघटना, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने सात दिवसीय ऑनलाइन-ऑफलाइन स्मार्ट गर्ल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन संघटनेचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष संजय आंचलिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब, विद्यालयाचे अध्यक्ष महेंद्र गुप्ता, विनोद अग्रवाल, अॅड. अभय सेठिया, शिखरचंद लोहाडे, किरण रायबागकर, उर्मिला पिपाडा, मंजू कोटेचा व प्राचार्य डॉ. विजय नागोरी, उपप्राचार्य डॉ. विद्या पटवारी आदींची उपस्थिती होती.
संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या प्रेरणेने हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला शासनाने मान्यता दिली आहे. सर्व शाळांमध्ये मुलींसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. देशात ३०० प्रशिक्षकांच्या माध्यमाने शिबिरे घेऊन जवळपास २५ लाख मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलींनो आत्मविश्वासाने जगा, जग तुमच्या सन्मान करेन. आधुनिक तंत्रज्ञानाचा सदुपयोग करुन दुरुपयोग टाळावा, असे आवाहन हस्तीमल बंब यांनी केले. प्रा. डॉ. नागोरी, विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुकेश अग्रवाल, संजय अग्रवाल, गणेश अग्रवाल, श्यामसुंदर अग्रवाल, जितेंद्र गुप्ता, सुरेंद्र अग्रवाल, विनोद अग्रवाल, राजेश अग्रवाल, जगदीश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मंजू मुथ्था, अंजली कुलकर्णी, डॉ. जयश्री वाडेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू मुथ्था यांनी, तर आभार अंजू कुलकर्णी यांनी मानले.