शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब; पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST

जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जालनेकरांना किमान एक वर्ष तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.जालना शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर या तलावाची उभारणी ही निजामकाळात झाली आहे. साधारणपणे १९३२ मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले होते. हा तलाव बांधताना जालना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तो बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातून जालन्यातील जेईएस महाविद्यालय जवळ असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वबलाने पाणी पाईप लाईनव्दारे येते. वीजेचा मोठा खर्च यामुळे वाचतो.संपूर्ण पावसाळ्यात या तलावात थेंबही नव्हता. परंतु २१ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने या तलावाच्या कॅचमेंट एरियात भरपूर हजेरी लावल्याने तलावात हळूहळू पाणी येत गेले. रविवारी मध्यरात्री या तलावातील पाणी पातळी ही साडे अठरा फुटांवर पोहोचल्याने तो सकाळी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगण्यात आले.जालना शहराला आज जरी जायकवाडी येथून पाणीपुरवठा होत असला तरी, घाणेवाडी जलाशयातून संपूर्ण नवीन जालना क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामूळे पालिकेची किमान एक वर्षाचा त्रास कमी झाला असून, नागरिकांना या पाण्याचे नीट नियोजन केल्यास टंचाई जाणवणार नाही. हा तलाव भरल्याने त्याच्या खाली असलेले जवळपास पाच बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी