जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:52+5:302021-04-01T04:30:52+5:30
जालना : जालना जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष नानासाहेब अप्पासाहेब उगले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ...

जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा
जालना : जालना जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष नानासाहेब अप्पासाहेब उगले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ऑनलाईन पार पडली. या सभेत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष संभाजी वाकडे, संचालक दादाराव माणिकराव पाचफुले, संजय पातेकर, सुभाष लहाने, विजय राऊत, ज्ञानेश्वर डुकरे, नारायण आस्कंद उपस्थित होते. मजूर सहकारी संस्थांना मागील पाच वर्षांपासून ३ लाख रूपयांपर्यंतची कामे अत्यंत कमी प्रमाणात मिळत असल्याने बऱ्याचशा संस्था कामापासून वंचित आहेत. महाराष्ट्रातील सर्व मजूर संघ व महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या प्रयत्नाने मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा १० लाखांपर्यंतची कामे देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांचेही आभार मानण्यात आले.