गौरी, गणपतीच्या तयारीसाठी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:00+5:302021-09-09T04:37:00+5:30
गणेश उत्सव म्हटले की, विशेष करून बच्चे कंपनी आणि तरुणांमध्ये मोठा उत्साह असतो. यावेळी देखील हैदराबाद, पेण तसेच स्थानिक ...

गौरी, गणपतीच्या तयारीसाठी बाजारपेठेत गर्दी
गणेश उत्सव म्हटले की, विशेष करून बच्चे कंपनी आणि तरुणांमध्ये मोठा उत्साह असतो. यावेळी देखील हैदराबाद, पेण तसेच स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. त्यात अनेक मूर्ती अत्यंत सुबक आणि आकर्षक असून, सेल्फी काढताना गणपती, मास्क परिधान केलेली मूर्ती आदींचा यात समावेश आहे. महालक्ष्मी सणानिमित्त बाजारपेठ सजली असून, विविध प्रकारचे हार, तोरण तसेच अन्य सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती व्यापारी वाणी यांनी सांगितले.
शाडूच्या मातींच्या मूर्तींना मागणी
यंदा सरकारने चार फुटांच्या वर गणेश मूर्ती बसवण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे लहान-लहान मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. येथील जुने मूर्तीकार अनिल कुलकर्णी यांनी देखील मुलांमध्ये मूर्ती कलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने दहा दिवसांचे शाडूच्या गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिभा श्रीपत यांनीही पर्यवरणपूरक मूर्ती उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.