गॅस सिलेंडर ५० रूपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:05+5:302020-12-23T04:27:05+5:30
ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. तर ...

गॅस सिलेंडर ५० रूपयांनी महागले
ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. तर ५ किलो ग्राम छोट्या सिलेंडरच्या किमतीत १८ रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीची सर्वसामान्य नागरिकांना झळ बसली आहे. अगोदरच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गरजांना कात्री लावून काटकसर सुरू केली आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने सामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. सध्या अंबड तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडर ६५३ रुपयांवरून ७०३ रूपयांना मिळत आहे. व्यावसायिक सिलेंडर १३२३ वरून १३५९ रूपयांना मिळत आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. शासनाकडून रॉकेल पुरवठा बंद झाल्याने सर्वसामान्यांपुढे गॅस सिलेंडरशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे शासनाने किमान सिलेंडरचे दर स्थिर ठेवावे, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक महिन्याला कोणत्या न कोणत्या वस्तूचे दर वाढत असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
शिवकन्या खांडेभराड, वडीगोद्री
गॅस ही स्वयंपाक घरातील सर्वात गरजेची वस्तू आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर हे नियंत्रणात असणे गरजेचे आहे. महागाईमुळे मासिक बजेट कोलमडून लागले आहे. त्यामुळे आम्हाला कसरतच करावी लागत आहे.
मीना पवार, वडीगोद्री