गणेश पाउलबुध्दे उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST2021-06-16T04:39:44+5:302021-06-16T04:39:44+5:30

शेतकरी चिंतेत अंबड : रोहिलागड परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारली. परिणामी, सुरुवातीलाच पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ...

Ganesh Paulbuddhe as Vice President | गणेश पाउलबुध्दे उपाध्यक्षपदी

गणेश पाउलबुध्दे उपाध्यक्षपदी

शेतकरी चिंतेत

अंबड : रोहिलागड परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारली. परिणामी, सुरुवातीलाच पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता चिंत्ता सतावत आहे. नुकत्याच उगवलेल्या पिकांना हंडा व बादलीने पाणी देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

कुंभारपिंपळगाव येथे वाहकाचा सत्कार

घनसावंगी : अंबड आगाराच्या वतीने शनिवारपासून अंबड - लातूर बससेवा सुरू करण्यात आली आहे. बसच्या वाहक व चालकांचा येथील ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बापूसाहेब आर्दड, अशोक जाधव, रमेश तौर, कालिदास तौर, गणेश ओझा यांच्यासह ग्रामस्थ व प्रवाशांची उपस्थिती होती. याप्रसंगी चालक व वाहकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

जालना : विनापरवाना जुगार खेळणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मदन कंटुले, बंडू धोंडिबा कंटुले यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल हरीश चंद्रे करीत आहेत.

निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

जालना : जालना जिल्हा पक्षनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार संजय वाघचौरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बबलू चौधरी, बाळासाहेब वाकुळणीकर, नगरसेवक फिरोज पठाण, बाबासाहेब दराडे, अदनान सौदागर, शेख इकबाल, अरुण पैठणे, प्रशांत जऱ्हाड, राम जोशी, अंकुश वाघ, सुभाष जगताप, शमशेर पटेल आदी उपस्थित होते.

मराठा भवनसाठी २१ हजारांची मदत

परतूर : शहरातील नगरसेवक संदीप बाहेकर यांनी शहरात उभारण्यात येत असलेल्या मराठा क्रांती भवनासाठी २१ हजारांची मदत केली आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासिका आदी सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. रवींद्र बरकुले, प्रा. पांडुरंग नवल, अशोक तनपुरे, राजेश भुजबळ, नवनाथ तनपुरे, संदीप जगताप आदींची उपस्थिती होती.

गोपी - खासगाव रस्त्याच्या कामास प्रारंभ

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील गोपी ते खासगाव रस्त्याच्या खडीकरणाच्या कामास रविवारी प्रारंभ करण्यात आला. रमेश पाटील गव्हाड यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी रस्ता खडीकरणासाठी ३० लाख लाख रुपये मंजूर केले. यावेळी मंगेश गव्हाड, राजू अंभोरे, समाधान काकडे, भगवान काकडे, देविदास डुकरे, अनिल बारगळ, कृष्णा डुकरे, अशोक खेकाळे, विलास लोखंडे, गुलाबराव लोखंडे, किशोर लोखंडे, विलास गावडे हे हजर होते.

आन्वा व परिसरात वृक्षारोपण

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे युवकांच्या वृक्षारोपण व संगोपन समितीकडून रविवारी ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. कधी काळी आन्वा परिसर निसर्गाने नटलेला होता. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. यामुळेच हा परिसर उजाड झाला आहे. यावेळी उपसरपंच कैलास खंडेलवाल, अजितसिंग पाटील, एकनाथ पांडव, जीवन देशमुख, गणेश देशमुख, रघुनंदन खंडेलवाल, भगवान खाकरे, अमरजित देशमुख, संजय काकडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Ganesh Paulbuddhe as Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.