गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:37+5:302021-09-07T04:36:37+5:30

महासचिव नंद यादव, कार्याध्यक्ष पल्लोड जालना : जिल्हा श्री गणेश महासंघाची विशेष बैठक आर्य समाजमंदिरात पार पडली. या ...

Ganesh Mahasangh executive announced | गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर

गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर

महासचिव नंद यादव, कार्याध्यक्ष पल्लोड

जालना : जिल्हा श्री गणेश महासंघाची विशेष बैठक आर्य समाजमंदिरात पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी कपिल अग्रवाल, महासचिव मनीष नंद, तर कार्याध्यक्ष म्हणून विशाल पल्लोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रारंभी मावळते अध्यक्ष तथा नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी गेल्यावर्षीचा अहवाल सादर केला.

या बैठकीस गजेंद्र बागडी यांची सर्वानुमते कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष कपिल गजबीये-अग्रवाल त्यांचा सत्कार विष्णू पाचफुले यांनी पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याचवेळी अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कपिल अग्रवाल यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, गणेश महासंघ गेल्या ३३ वर्षांपासून काम करीत असल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात खबरदारी घेऊन हा उत्सव सर्वांनी साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी माजी अध्यक्ष विरेंद्र धोका, अर्जुन ढहाळे, कमलेश खरे, किशोर जैन, पवन भगत, अक्षय भुरेवाल, नारायण भगत, दिनेश नंद, सोमेश काबलिये, मोहन पहेलवान परिवाले, मनीष बोरा, मनोज लहाने, तुकाराम मिसाळ, दिनेश भगत, अतिन सकलेचा आदीसह अन्य पदाधिकारी हजर होते.

Web Title: Ganesh Mahasangh executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.