लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील जवाहरबाग येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गणेश महेश बिराजदार (रा. जवाहरबाग), अनिल गोविंद काळे (रा. मोदीखाना), सुभाष बाबूराव क्षीरसागर (रा. पंचशील दवाखान्या जवळ) शेख शब्बीर शे. छोटूमियाँ (रा. मूर्तीबेस), महेश विठ्ठ्ल बिराजदार (रा. जवाहरबाग), शंकर प्रल्हाद खंदारे (रा. नाथबाब मंदिर छाईपुरा), पूनमचंद रामचंद्र सतपुरीये (रा. जवाहरबाग), दिनेश गणेशलाल मंडोर (रा. जवाहरबाग), विजय जानकीराम देवडे (रा. जवाहरबाग), अशी आरोपींची नावे आहेत.विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, जवाहरबाग येथे काही लोक पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. या माहितीवरुन पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, कर्मचारी सचिन आर्य, श्रीकुमार आडेप, चालक वानखेडे यांनी केली.
जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:41 IST