अंबड शहरात जुगार खेळणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:30+5:302021-04-03T04:26:30+5:30
ट्रॉली उलटली ; दोघे जखमी जालना : ऊस घेऊन जाणारी ट्रॉली उलटी होऊन दोघांच्या अंगावर पडली. या अपघात दोघे ...

अंबड शहरात जुगार खेळणारे अटकेत
ट्रॉली उलटली ; दोघे जखमी
जालना : ऊस घेऊन जाणारी ट्रॉली उलटी होऊन दोघांच्या अंगावर पडली. या अपघात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी गोंदी येथे घडली. याप्रकरणी लहू परासे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दिवटे हे करीत आहेत.
भोगगाव येथे घर फोडले ; मुद्देमाल लंपास
जालना : घराचे दार उघडून घराच्या आत प्रवेश करून कपाटातील ७० हजार रूपये रोख व सोन्याची अंगठी असा १ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे घडली. या प्रकरणी एकनाथ तुकाराम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सचिन भरत अंधारे यांच्याविरूद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि कौळासे हे करीत आहेत.
शिवशाहीची दुचाकीला धडक ; एक जखमी
जालना : भावाला दुचाकीवरून पान्हा देण्यासाठी जाणाऱ्यास शिवशाही बसने जोराची धडक दिल्याची घटना १४ मार्च रोजी भोकरदन नाका येथे घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शेख नूर शेख अमिन यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना खार्डे हे करीत आहेत.
एमआयडीसी येथून दुचाकी चोरीस
जालना : जालना शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरी गेल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. या प्रकरणी कालिंदा गौतम रत्नपारखे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.