जुगारी अटकेत : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:22+5:302021-05-16T04:29:22+5:30
मोबाईल चोरला : गुन्हा दाखल जालना : भाजीपाला घेत असताना अज्ञात व्यक्तीने १५ हजार रूपयांचा मोबाईल खिशातून चोरून नेल्याची ...

जुगारी अटकेत : गुन्हा दाखल
मोबाईल चोरला : गुन्हा दाखल
जालना : भाजीपाला घेत असताना अज्ञात व्यक्तीने १५ हजार रूपयांचा मोबाईल खिशातून चोरून नेल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथे घडली. याप्रकरणी सुधीर मोतीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ दाभाडे हे करीत आहेत.
देशी दारूची वाहतूक करणारा अटकेत
जालना : अवैधरित्या २४०० रूपयांच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या एका पांढºया गोणीत घेऊन जाणाºयास पोलिसांनी मंठा चौफुली १५ मे रोजी घडली. या प्रकरणी दीपक आढे यांच्या फिर्यादीवर नागनाथ सुर्यभान डूकरे (रा. पांगरी, ता. जिंतूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील नापोकॉ. ढवळे हे करीत आहेत.
जेसीबी मशीनमधील डिझेल, बॅटरी चोरीस
जालना : घरासमोर उभा केलेल्या जेसीबीमधील डिझेल, बॅटरी, फॅन असा २१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना हसनाबाद येथे घडली. याप्रकरणी शे. अजीज यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नापोकॉ चव्हाण हे करीत आहेत.