काॅंग्रेसचे नेते माजी आमदार संतोषराव दसपुते यांचे गुरूवारी निधन झाले होते. शुक्रवारी त्यांच्यावर मूळगावी भायडी येथील दसपुते यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजेंद्र दसपुते यांनी मुखाग्नी दिला.
यावेळी , कॉंग्रेस माजी मंत्री अनिल पटेल, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे बदनापूरचे आमदार नारायण कुचे , हभप माऊली महाराज , सस्ते महाराज फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे , भोकरदन राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सिल्लोडचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे , उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार सतीश सोनी,भीमराव डोंगरे, रामदास पालोदकर, लक्ष्मण दळवी, जि. प. सदस्य डॉ चंद्रकांत साबळे , रमेश गव्हाड, सभापती कोवतीकराव जगताप,मनीषा जंजाळ, विठ्ठल चिंचपुरे, विनोद गावंडे , डॉ सी आर तांदुळजे , माजी सभापती सुदामराव सदाशिवे,माजी नगराध्यक्ष ॲड. हर्षकुमार जाधव, सुधाकर दानवे कॉंग्रेसचे न प गटनेते संतोष अन्नदाते, श्रीरंग पाटील, केशव जंजाळ रामेश्वर जंजाळ, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते..सहभागी मान्यवरांनी देखील माजी आ. संतोषराव दसपुते यांच्या अनेक आठवणी सांगून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चौकट
परिवारातील सदस्याला गमावले
भोकरदनचे माजी आ. संतोषराव दसपुते यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांचे आणि माझ्या वडिलांसह आमच्या परिवाराचे पारिवारिक संबंध होते. अत्यंत मनमिळाऊ आणि मायाळू व्यक्ती म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसच्या एका निष्ठावान पदाधिकाऱ्यास मुकलो आहोत.
अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकामंत्री,