बांधकाम विभागाला मिळाले पूर्णवेळ अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:42 IST2018-06-14T00:42:52+5:302018-06-14T00:42:52+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने याचा प्रभारी पदभार बदनापूरचे उपअभियंता देवरे यांच्याकडे होता. आता नाशिक येथील बांधकाम विभागातील कार्यरत असलेले एस.पी. बागडी हे पूर्णवेळ अभियंता म्हणून लाभले आहेत.

बांधकाम विभागाला मिळाले पूर्णवेळ अभियंता
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने याचा प्रभारी पदभार बदनापूरचे उपअभियंता देवरे यांच्याकडे होता. आता नाशिक येथील बांधकाम विभागातील कार्यरत असलेले एस.पी. बागडी हे पूर्णवेळ अभियंता म्हणून लाभले आहेत.
गेल्या वर्षभरापासून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नव्हते. त्यामुळे त्या पदाचा कारभार बनापूर येथील देवरे यांच्याकडे देण्यात आला होता. बागडी यांना रूजू करून घेण्यासाठी ते जालन्यात येऊन गेले, त्यानंतर रूजू होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी नियमानुसार देण्यात येतो. हा कालावधी संपल्यावर ते रूजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बागडी यांची ओळख कडकशिस्तीचे अधिकारी म्हणून असल्याने त्यांना येथे रूजू करून घेण्यावरून खल सुरू आहे.